जिल्ह्य़ातील तथा जिल्ह्य़ाबाहेरील हळद उत्पादक शेतकरी मोठ्याप्रमाणावर हळद विक्रीसाठी बाजारात आनत आहेत. आचानक मार्केटला हळदची विक्रमी आवक येत असल्यामुळे शेतकऱ्यांची भावा मधे आणि इतर सर्व बाबतीत हेळसांड होत आहे. वर्षभर जपलेल्या आणि उत्पादनास खर्चिक आसणार्या हळद पीकस योग्य भाव मिळने गरजेचे आहे. भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून भागातील सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे कि शेतकऱ्यांनी हळद टप्प्या – टप्प्याने विक्रीसाठी काढावी. एकदम मार्केट ला गर्दी होनार नाही याची काळजी घ्यावी. गरज नसणाऱ्या शेतकऱ्यांनी हळद विक्रीची घाई करू नये. प्रत्येक क्षेत्रात गर्दीचा फायदा घेणार्या यंत्रणा आसतात त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी व हळद टप्प्या- टप्प्याने विक्रीस आनन्याचे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे.
Users Today : 17