पातूर युवासेना च्या उपशहर पदी दिनेश काळपांडे यांची नियुक्ती व इतर युवकांचा जाहीर प्रवेश

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी 

पातूर येथे युवा सेना प्रमुख माननीय आदित्य साहेब ठाकरे तसेच युवा सेना सचिव माननीय वरून जी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली

तसेच बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय नितीनबापू देशमुख , युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. दिपकभाऊ बोचरे, यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, शिवसेना तालुकाप्रमुख रवीभाऊ मुर्तडकर ,शिवसेना विधानसभा सहसंघटक अंबादास भाऊ देवकर शिवसेना निवासी उपतालुकाप्रमुख अनिलभाऊ निमकंडे ,शिवसेना उपशहर प्रमुख विशालभाऊ तेजवाल, युवासेना तालुका सचिव गणेश काळपांडे, युवासेना शहरप्रमुख अब्दुल मुक्तार भाई यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच युवासेना तालुकाप्रमुख सागर रामेकर यांच्या नेतृत्वात युवा सेनेचा कार्यक्रम पातुर शासकीय विश्रामगृह येथे पार पडला.

यावेळी शिवनगर येथील सनद गवई , रवि ढगे,प्रज्वल बंड , अजय डाखोरे , गोलु मेटांगे , प्रथमेश काळपांडे , गणेश डोंगरे , प्रेम काळपांडे या युवकांचा शिवसेनेत प्रवेश झाला असून युवासेना उप शहर प्रमुख पदी दिनेश काळपांडे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच 28 मे रोजी नेपाळ काठमांडू येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये राजमाता जिजाऊ क्रीडा बहुउद्देशीय संस्था पातुर संस्थेचे विद्यार्थी कु. नव्या प्रकाश सास्ते, कु. वैष्णवी किसन राठोड, चि. प्रतीक नंदकुमार मारोटकर यांची निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी शिवसेना युवासेनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

0 9 4 6 7 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *