कार्यालय प्रतिनिधी
मुंबई २४ : मेळघाटातील रमेश धुर्व हे पोटाची भूक भागविण्यासाठी मुंबई आले.मुबई येथे काम करत असतांना त्यांचा मुलगा विशाल हा रोडवर पडला.मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव चालु होता.ही बाब रूग्णसेवक शिवकुमार बायस यांचा निदर्शनास आली त्यांनी विवरा येथील रूग्णांसाठी देवदूत असणा-या समाज सेवक मंगेश केनेकर यांना फोन वर सर्व हकीकत सांगीतली . त्यांनी क्षणाचा विलंब न करता मुंबई तील हिदुंजा हॉस्पीटल येथील डॉ.विवेक शेट्टी यांस संम्पर्क केला आणी विशालला तेथे नेण्यास सांगीतले.डॉ विवेक शेट्टी यांनी तात्काळ ७० हजारांची सर्जरी करण्याचे सांगीतले तेव्हा विवरा येथील रुग्नसेवक मंगेश केनेकर यांनी एका तासात महाराष्ट्र राज्य रुग्नसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रविण भोटकर यांच्या मार्गदर्शनात ७० हजारांची मदत मुंबई येथील युवा फाऊडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली त्या मदतीने विशालची सर्जरी यशस्वी झाली. आज विशालची तब्येत ठणठणीत आहे हे पाहून त्याच्या वडिलांनी महाराष्ट राज्य रुग्नसेवक व श्रमीक कामगार सघटणेचे शतशः आभार मानले आहे.
Users Today : 28