मुंडगाव येथे भीषण पाणीटंचाई तेरा दिवसाआड पाणी पुरवठा नागरिक त्रस्त 

Khozmaster
2 Min Read

 

 

  •  मुंडगाव येथे भीषण पाणीटंचाई तेरा दिवसाआड पाणी पुरवठा नागरिक त्रस्त

 

 

 

अन्यथा जनआंदोलन तुषार पाचकोर

वणी वारूळा मार्गे पाणीपुरवठा सुरू करायची मागणी

 

 

*अकोट प्रतिनिधी विशाल गवई

 

तालुक्यातील मुंडगाव येथील लोकसंख्या दहा हजाराच्या वर आहे.एकेकाळी मुंडगावात पाण्याची श्रीमंती होती. प्रत्येक घरा आड विहीर होती .मात्र भूगर्भातील जलस्त्रोत्र संपल्यागत झाल्याने बहुतांश ग्रामस्थांनी अस्तित्वात असणाऱ्या विहिरी बुजवून टा कल्या. गेल्या तीन दशकापासून मुंडगाव ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागावर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी बहुसंख्य लोकवस्तीच्या या गावात जनतेला पाण्यासाठी त्राही भगवान व्हावे लागत आहे. येथे असणारे पाण्याचे दोन मोठे जलकुंभ कधीच भरल्या जात नाहीत वाण धरणात परिपूर्ण जलसाठा असताना मुंडगाव ग्रामस्थांचा घशा मात्र कोरडा राहतो ही खेदाची बाब म्हणावी लागेल .गेल्या दोन दशकापासून मुंडगाव ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी याबाबत मुंडगाव ग्रामपंचायत वारंवार पाठपुरावा करते मात्र पालथ्या घागरीवर पाणी असा प्रकार आहे. ही परिस्थिती मात्र सुधारायचे नाव घेत नाही आता पुन्हा अकोट तालुक्यातील सर्वात मोठ्या लोक वस्तीच्या गावात पाण्याची वाणवा आहे. येथे शाळा महाविद्यालय कृषी विद्यालय एक डझनभर धार्मिक संस्था व संत गजानन महाराज पादुका संस्थानचे मोठे प्रस्थ आहे. अशा स्थितीत या गावाकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे साप दुर्लक्ष आहे. ही बाब अकोट मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या आमदार भारसाकडे यांच्यासाठी निश्चितच भूषण नाव नाही, या गंभीर प्रकाराबाबत अकोट तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा मुंडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच तुषार पाचकोर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ला ही बाब एका निवेदनाद्वारे अवगत करून दिली. मुंडगाव गावासाठी वणी वारूळा मार्गे जर पाणी पुरवठा केल्यास सदर पाणीपुरवठा सुव्यवस्थित मिळू शकतो असेही पाचपोर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर तुषार पाचकोर ,शेख अजीज, सचिन सरकटे ,संजय बोरकर ,अशोक काठोके, भगवान गावंडे ,डॉ. राजेंद्र नाथे, विजय आकोते ,अशोकराव काठोळे, दीपक मुंडोकार ,जुगल चिंचोलकर ,दीपक चिंचोळकर इमरान खान. इयुफ खा आदींसह नागरिक उपस्थित होते.

0 9 4 6 7 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *