प्रतिनिधी रामेश्वर वाढी
इंडिकेटल्स नामक वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक आद्य समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विकृत लिखाण केलेले आहे सावित्रीबाई फुले यांच्या कामाबद्दल इंडिकेटल्स च्या लेखात अतिशय अपमान जनक भाषेचा वापर करण्यात आला आहे छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाई यांची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय अत्यंत वेदनादायी आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण साठी आपल्या आयुष्य खर्ची घातले सदर पोर्टलवर इतिहासाची पुनर्बांधणी म्हणून अतिशय संताप जनक प्रकार चालू आहे सदर पोर्टलवर बंदी आणून लेखकावर कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी पातुर ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी वर्षा संजय बगाडे तुळसाबाई गाडगे हर्षदा बंड ऐश्वर्या उगले परशराम उंबरकर मोहन गाडगे परशराम बंड किरण कुमार निमकंडे प्रदीप काळपांडे निखिल इंगळे सुरेंद्र उगले उद्धव आवटे अमोल सुरवाडे हृतिक हिरळकार आदी शहरवासी उपस्थित होते
Users Today : 28