आलेगाव येथील मोबाईल द्वारे आक्षेपार्ह पोस्ट ठेवणे पडले महागात   युवकाविरूद्ध गुन्हा दाखल शांतता ठेवण्याचे पोलीसांनी केले आवाहन

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी योगेश नागोलकार

पातूर तालुक्यांतील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत एका गावातील युवकाने त्याच्या मोबाईल वरती एका विशिष्ट धर्माबद्दल आक्षेपार्ह वॉट्सआप वरती व्हिडिओ स्टेटस ला ठेऊन ऐका विशिष्ठ धर्माच्या धार्मिक श्रद्धाचा अपमान केल्या बद्दल आलेगाव येथील ऐका युवकाविरुढ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आलेगाव येथील ऐका युवकाने गावातीलच ऐका युवका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 31 तारखेला गावातील व परिसरातील 70 ते 80 युवक चान्नी पोलिस स्टेशन येथील गुन्हा दाखल करण्याकरीता दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहता गोकुळ राज सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपपविभगिय पोलिस अधिकारी बाळापूर व ठाणेदार योगेश वाघमारे पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन यांनी गावातील सर्व युवकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केलें. व सर्वांचे समजूत काढली आरोपी विरूद्ध पोलिसांनी तत्काळ कोणत्याही वर्गाच्या धर्माच्या अपमान करण्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल केला असून. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला जामीनावर मुक्त केले आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश महाजन करीत आहेत. पोलिसांनी तत्काळ गावांमध्ये शांतता समितीची बैठक घेउन लोकांनां योग्य मार्गदर्शन केले. व मोबाईल वरती कोणतेही आक्षेपार्ह व्हिडिओ स्टेटस कॉमेंट फॉरवर्ड करू नका. इत्यादि प्रकारचे मार्गदर्शन पोलिसांनी केलें.

0 9 4 6 7 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *