
राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांच्या अपघातात एक ठार मु र्तिजापूर नजीकची घटना
प्रतिनिधी विशाल गवई अकोला
राष्ट्रीय महामार्गावर मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरबडी नजीक दोन वाहनांच्या अपघातात एक जण चालक ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी सहा वाजता दरम्यान दिनांक 11 जुन रोजी घडली,तर चालक अजयसिंग अमरसिंग सिग असे मृतकाचे नाव आहे
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती कडून अकोला कडे जाणारा मालवाहू ट्रक क्रमांक एम एच 28 ए बी 8917 हा जात होता तर कंपनीची पिकप गाडी ही अमरावती कडे जात होती दरम्यान या दोन वाहनाचा खरबडी नजीक दोन वाहनाचा समोरा समोर भिषण अपघात झाला या अपघातात पिकप गाडी चा चालक अजयसिंग अमरसिंग सिग वय 45 शिवरानी उत्तर प्रदेश
हा गंभीर जखमी झाला,व या अपघातात घटस्थळी मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी हेडकॉन्स्टेबल दिपक कानडे, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर रडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुर्तिजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला पुढील तपास ठाणेदार गोविंद पाडंव ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल दिपक कानडे सह पोलिस करीत आहेत
Users Today : 28