
विदर्भातील कलावंतांची कलाक्षेत्रात उंच भरारी
चित्रपट .’खेड्यातलं येडं प्रेम ‘
चित्रपटाची निर्मिती करून उमटविला वेगळा ठसा
निर्माता अशोकराव तायडे पाटील
प्रतिनिधी संतोष गवई अकोला
मुंबई, पुणे, कोल्हापुर प्रमाणे विदर्भातील कलावंतांनी कलाक्षेत्रात मेहनतीच्या जोरावर चित्रपट निर्मितीमध्ये आपलावेगळा ठसा निर्माण केला असुन येत्या 30 जून ला खास विदर्भातील मातीचा गंध असलेला हृदयस्पर्शी मराठी चित्रपट खेड्यातलं येडं प्रेम महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे, या चित्रपटाचे निर्माते अशोक श्रीरामजी पाटील तर कार्यकारी निर्माते डॉ. राजकुमार वैराळे, दिग्दर्शक कृष्णगोपाल वानखडे असून कथा, पटकथाव व गित माणिक गवई यांनी लिहिले आहे. संगीत प्रेमचंद कांबळे यांचे तर छायांकण

निलेश वानखडे यांनी केले चित्रपटाची जमेची बाजु म्हणजे यामध्ये धुमधडाका , दे दणादण फेम प्रेमाकीरण विषेश भुमिकेसह विदर्भातील मयूर, प्रगती पाटील सह संदिप दिशा, स्वप्नाली बंड, स्वर्णपाल डोंगरे, रवि नवलकार, शाम पींपळकर, डॉ राजकुमार वैराळे, अॅड बॉबी देशमुख, राहूल वानखडे, विमल भगत, भागवत केंद्रे, दिनेश डोंगरे,ललीता भगत, गौरी पाटील, बालकलाकार अजिंक्य पाटील, गुंजन वानखडे, व विशेष भुमिकेत कृष्णगोपाल वानखडे दिसणार आहेत या चित्रपटाचा पोस्टर व ट्रेलर लॉन्च सोहळा दि. 9 जून ला बोरगाव मंजू येथील संत गजानन महाराज सभागृहात माजी आमदार बळीराम सिरसकार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमात प्रमुख पाहूणे शिरीष धोत्रे अध्यक्ष कृ. उ बाजर समिती अकोला,ज्ञानेश्वर सुलताने गटनेते जि प, निताताई गवई जि प सदस्या, अनिताताई खेडकर सरपंच बोरगाव मंजू, सुभाष सातव (मार्गदर्शक अ भा. माळीसंघ), डॉ. केशवजी काळे, डॉ सचिन दायमा, ललीतशेठ अजमेरा, डॉ. संतोष हूसे, उमेश मसने, रामदासजी खंडारे, दिनकर वाघ, वामनराव तायडे मा. उपसभापती, उत्तमराव मैसने आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्माते अशोक पाटील यांनी केले सूत्रसंचालन मनिष तिवारी यांनी तर आभार डॉ राजकुमार वैराळे यांनी मानले कार्यक्रमाला चित्रपटातील कलाकार,पत्रकार, तसेच कलारसिक मोठ्या संख्येत उपस्थित होते
Users Today : 28