आळंदी येथे वारकरी समुदायावर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे निदर्शने*

Khozmaster
1 Min Read

*आळंदी येथे वारकरी समुदायावर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे निदर्शने*

प्रतिनिधी विशाल गवई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आळंदी येथे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या वेळी पोलीस प्रशासनाने वारकरी समुदायावर जो लाठीचार्ज करण्यात आला त्याच्या निषेधार्थ शिवसेना तेल्हारा शहर व ग्रामीण च्या वतीने आज तहसील कार्यालय तेल्हारा येथे निदर्शने करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी तशेच झालेल्या घृणास्पद प्रकाराची मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी जवाबदारी स्वीकारून त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे यावेळी प्रमुख उपस्थितीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे,शिवसेना शहरप्रमुख विवेक खारोडे,विधानसभा सहसंघटक पप्पुसेठ सोनटक्के,उपतालुकाप्रमुख पुरुषोत्तम गावंडे,विधानसभा सहसमनव्यक गजानन मोरखडे,उपशहरप्रमूख गौतम दामोदर,पंकज कवर,माजी शहरप्रमुख राजेश वानखडे,निलेश धनभर,सुधाकर गावंडे,युवासेनेचे प्रज्वल मोहोड,राहुल पुदाखे,प्रकाश खारोडे,संजय देशमुख, आदित्य उमाळे,कैलास श्रीवास,संभाजी वानखडे,निशांत नेमाडे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

0 9 4 6 7 8
Users Today : 28
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *