प्रतिनिधी योगेश नागोलकार
पातुर:- चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मळसूर व आलेगाव येथे उप अधीक्षक तथा प्रभारी ठाणेदार विपुल पाटील यांनी ठाण्याचा कार्यभार सांभाळतात अवैध धंद्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळी पोलिसांना मिळालेला गुप्त माहीतीवरून चान्नी पोलीस स्टेशन परीसरात परि. पोलीस अधीक्षक यांनी ग्राम मळसुर येथील आरोपी मनोहर शालीग्राम तायडे वय ५३ वर्ष यांचे पानटपरी वर रेड कारवाई करून त्यांचेकडुन शासनाने प्रतिबंधीत केलेल्या नशाकारक, मानवी आरोग्यास अपायकारक तंबाखुजन्य, सुगंधीत गुटखा पदार्थ व मोबाईल फोन असा एकूण 21106 रू. चा मुददेमाल जप्त तसेच रविंद्र गजानन खंडारे मळसूर यांचे कडुन शासनाने प्रतिबंधीत केलेल्या नशाकारक, मानवी आरोग्यास अपायकारक तंबाखुजन्य, सुगंधीत गुटखा पदार्थ व मोबाईल फोन असा एकुण 12590. चा मुददेमाल जप्त केला व आलेगाव येथील शिवाजी चौकातील प्रशांत अश्रू पायघन यांचेवर अवैद्य कारवाई करून आरोपी १) अश्रू पायघन २)अजय बंडू मेसरे वय २१ वर्ष यांचे ताब्यातुन शासनाने प्रतिबंधीत केलेल्या नशाकारक, मानवी आरोग्यास अपायकारक तंबाखुजन्य, सुगंधीत गुटखा पदार्थ व 2 मोबाईल फोन असा एकुण 34496 रु. असा एकुण पूर्ण 68193 चा मुददेमाल जप्त केला आहे.सदरची रेड कारवाई परि. पोलीस अधिक्षक विपुल पाटील प्रभारी ठाणेदार स्टेशन चान्नी यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि गणेश महाजन, पोहेकॉ बाळु येवले, दिनेश , पोकॉ सुनिल भाकरे, योगेश डाबेराव उमेश सांगळे यांनी केली असुन पुढील तपास पोउपनि गणेश महाजन करीत.
Users Today : 23