प्रतिनिधी योगेश नागोलकार
राहेर/पातुर:- मळसुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व परिचारिका यांना निलंबित करा अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश असोले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.पातुर तालुक्यातील उमरा येथिल रहिवासी सौ कोमल गोपेश अल्हाट या गर्भवती महिला रुग्णाला ९ वा महिना असल्यामुळे व वेदना होत असल्याने त्यांचे पती गोपेश अल्हाट यांनी मळसुर प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका कुरे व तायडे व डॉ इफ्तेकार उपस्थित होते.त्यांना गोपेश अल्हाट यांनी सदर महिलेला वेदना होत आहेत त्यांची प्रसुती करा असे सांगितले असता, सदर परिचारिका व डॉक्टर यांनी गर्भवती रुग्ण महिलेची तपासणी न करता अकोला येथे जबरदस्तीने रेफर केले. व १०२ च्या रुग्णवाहिकेने आलेगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील डॉक्टरांनी पण काहीच उपचार केले नाहीत. त्यांनी लगेच रुग्णवाहिका बदलली व १०८ च्या रुग्णवाहिका केली.त्या १०८ च्या रुग्णवाहिकेत डॉक्टर उपस्थित नव्हते.म्हणुन आलेगांव प्राथमिक आरोग्य केद्रातुन १०८ या रुग्णवाहिकेत रुग्णला टाकुन अकोला येथे निघाले असता सदर गर्भवती महिलेला खुप वेदना होत होत्या.त्यामुळे आशा सेविका उज्वला रमेश लाड यांनी रस्त्यातच प्रसुती केली.आशा सेविका उज्वला रमेश लाड यांच्या मुळे सदर गर्भवती महिलेची प्रसूती झाली व त्या महिलेची व बाळाची प्रकृती ठीक असुन त्यांचा जिव वाचला १०८ च्या रुग्णवाहिकेत कोणत्या प्रकारची सुविधा नव्हती.प्रसुतीसाठी लागणारे कुठलेच साहित्य नव्हते.प्रसुती झाल्यानंतर डॉ फुरकान आले.आणी आशा सेविकेला म्हणाले ही डिलेवरी मी केली असे सांगावे या सदर प्रकरणी बेजबाबदार पणे वागणाऱ्या व डॉक्टर रुग्णवाहिकेत उपस्थित नसतांनी सुध्दा डिलिवरी मी केली असे आशाला खोटं बोलुन आपल्या चुकांवर पांघरूण घालणाऱ्या डॉ फुरकान व मळसुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर इफ्तेकार, परिचारिका कुरे आणी तायडे तसेच आलेगांव प्राथमिक आरोग्य केंद्रातिल कामचुकार डॉक्टर परिचारिका यांना तात्काळ निलंबित करा अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य तिव्र आंदोलन छेडेल यांची नोंद घ्यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुरेश असोले यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
Users Today : 23