विष प्राशन केलेल्या युवकांचा उपचारा दरम्यान मृत्यू पातुर तालुक्यातील उमरा येथील युवक तालुक्यात युवकांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले

KHOZ MASTER
1 Min Read

प्रतिनिधी योगेश नागोलकार

राहेर:-पातुर तालुक्यातील उमरा येथील अंकुश हरिचंद पुंडे या युवकाने आपल्या राहत्या घरात विष प्राशन केले असे समजताच घरच्यांनी व शेजारच्या मदतीने युवकांला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरु केले मात्र नियतीला शेवटी साथ दिली नाही युवक अंकुश हरिचंद पुंडे (25) याचा उपचार दरम्यान गुरुवारी सध्याकाळच्या सुमारास मृत्यू झाला. गेल्या आठवड्या भरापासून हा मुलगा मृत्यूशी झुंज देत होता.युवकाने विष प्रशान का केले हे कारण आध्यप कळले नाही.पातूर तालुक्यात आत्महत्याचे प्रमाण खूप वाढले आहे. युवापिढी ला योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे व अशा या घटलेल्या घटनेमुळे गावात व परिसरात शोककळा पसरली आहे.

0 9 7 2 2 6
Users Today : 24
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *