प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातूर :– तालुक्यांतील पंचायत समिती अंतर्गत आदिवासीं बहुल भाग असलेल्या जांब गावात जि. प. शाळेत एक ते आठ वर्गापर्यंत गावात शाळा आहे तेथे विद्यार्थी संख्याही पाहिजे त्या प्रमाणाच्या वरती आहे. मात्र शिक्षकाची संख्या फक्तं तीन आहे. त्यातही त्या मधील एका शिक्षकाला इतरत्र काम जसे मीटिंग, इलेक्शनची कामे, शाळेचे ऑनलाईन चे कामे करावे लागतात त्यामुळे एक ते आठ वर्गाची जबाबदारी दोनच शिक्षकावर अवलंबून आहे.त्या मुळे गावातील मुलांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे शिक्षण विभागाच्या हलगर्जी पणा मुळे विद्यार्थ्याचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या अनुषंगाने शाळेतील रिक्त पदे त्वरित भरावी. सदर शाळेमध्ये अटल तिक्रिंग लॅब उपलब्ध असून मानव विकास मिशन अंतर्गत रनीग ट्रॅक तयार करण्यासाठी सदर गावामधील शाळा प्रस्तावित आहे . करीता शाळेतील शिक्षकाचे सर्व पदे भरण्यात यावी अश्या प्रकारचे निवेदन देऊन अमोल प्रमोद घायवट ग्राम पंचायत सदस्य जांब यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, व शिक्षणं अधिकारी अकोला यांचे कडे मागणी केली आहे.
एकाच खोलीत दोन ते कधी तीन वर्ग बसविल्या जातात. त्या मुळे विद्यार्थ्याचा शिक्षणावर मोठा परिणाम पडत आहे. आदिवासीं बहुल भाग असल्यामुळे. व हे गाव तालुक्याच्या टोकावर असल्यामुळे पातुर पंचायत समिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांची नेहमीं डोळेझाक होत आहे.
आदिवासी बहुल गाव असल्यामुळे गावातील शेतमजुर आदिवासीं लोक कॉन्व्हेन्ट मध्ये आपले मुले शाळेची फीज भरून शिकवू शकत नाहीत मात्र सदर शाळेमध्ये शिक्षकच असल्यामुळे विद्यार्थ्यांना काय शिक्षणं मिळणारं असेल अशा प्रकारचा प्रश्न जांब वाशियामध्ये मध्ये निर्माण झाला आहे.
Users Today : 23