युवासेना उपजिल्हाप्रमुख पदी सागर रामेकर यांची नियुक्ती

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर :- पातूर येथील श्री सिदाजी महाराज संस्कृतीक सभागृह मध्ये युवा जनसंपर्क अभियान अंतर्गत युवासेनेचा पद ग्रहण चा कार्यक्रम संपन्न झाला यात पातूर येथील युवासेना चे तालुका प्रमुख सागर रामेकर यांचे पक्षातील व पक्षबांधणीतील कामे व नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे कार्य करत आहे त्यांनी अनेक लोकहिताची आंदोलने व मोर्चे काढले आहेत व पक्षासाठी वेळ काळ न पाहता पक्षासाठी काम करणे हेच काम पाहता शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, युवासेनेचे कार्यकारी सदस्य रुपेश कदम, विदर्भ सचिव सागर देशमुख, युवासेना विस्तारक वाणी सर शिवसेने चे उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, युवासेना जिल्हाप्रमुख दिपक बोचरे, यांनी सागर रामेकर यांची पदोन्नती करत यांना निवासी उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हाप्रमुख अभय खुमकर, तालुका प्रमुख रवींद्र मुर्तडकर माजी तालुका प्रमुख गजानन शिंदे, निवासी उप तालुका प्रमुख अनिल निमकंडे, परशराम उंबरकर, शहर प्रमुख निरंजन बंड, माजी नगर सेवक गजानन पिपंळघाट,सुनील गाडगे कार्यक्रम चे आयोजन सागर रामेकर व सूत्रसंचालन युवासेना उपजिल्हाप्रमुख भूषण गुजराथी यांनी केले या वेळी पधादिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 4 6 7 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *