कंचनपुरच्या गणेश ला रूग्णसेवक संघटना मिळवून देणार कृत्रिम पाय

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर दि २० – जिद्ध,चिकाटी मेहनत व आत्मविश्वासाच्या बळावर कंचनपुर खामगाव येथील गणेश आरव हा रूग्ण स्वःताच्या पायावर उभा करण्यासाठी विवराचे मंगेश केनेकरांनी पुढाकार घेऊन तीन लाखांची मदत मिळवून दिली.कंचनपुर ता खामगाव

येथील शेतमजुरी करणारे दिनकर आरज यांचा मुलगा गणेश याच्या दोन्ही पायाला खुप मोठया प्रमाणात जखमा होत्या त्यानी या आधी खूप ठिकाणी उपचार घेतले. मुबईतील जे जे हॉस्पीटल मधे सुद्धा उपचार घेतले परंतू त्याला यश आले नाही.

अशात त्या रूग्णाच्या विवरा येथील ओळखीचे धोत्रे कुटूंबाने मंगेश केनेकर यांना भेट घेऊन याबाबत सल्ला घेण्याचे सुचवले तेव्हा रूग्णांसाठी देवदूत असणा-या शेतकरी कुटुंबातील

मंगेश केनकर यांनी त्याला मुंबईतील नामांकित अशा हिंदुजा हॉस्पीटल मधे डॉ अभिजीत किन्ही सर यांना दाखवले असता डॉक्टरांनी गणेश चे दोन्ही पाय काढून टाकण्याचा सल्ला दिला व या सर्जरीसाठी तीन लाख खर्च येईल असे सांगीतले.

महाराष्ट्र राज्य रुग्नसेवक व श्रमीक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रविण भोटकर यांच्या मार्गदर्शनात मुबईतील विविध धर्मादाय संस्थाकडून मदत मिळवून दिली तसेच

संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले पिंपरी चिंचवड पुण्याचे शिवकुमार बायस यांनी त्या रूग्णाची त्याच्या नातेवाईकासह दादर येथील त्यांच्या निवासस्थानी राहण्याची व्यवस्था करून दिल्याने त्यांना मोठा आसरा मिळाला.

गणेशला लवकरच कृत्रीम पाय देण्याची जबाबदारी प्रविण भोटकर यांनी घेतली आहे.

बोरवली येथील डॉ निता मॅडम व रुग्नसेवक संघटनेचे आरज कुटूंबानी यावेळी खुप आभार मानले.

0 9 4 6 7 3
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *