प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातूर : मनरेगाच्या माध्यमातून घरकुल च्या पैशांचा अपहार केल्याचा खोटा आरोप लावल्यामुळे पातूर ड्राइवर समितीच्या इमारतीवर चढून एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम तुलंगा बु.येथील रोजगार सेवक लक्ष्मण ठाकरे यांनी मनरेगाच्या माध्यमातून होत असलेल्या घरकुल योजनेच्या मस्टर वर सह्या करण्याची धमकी देऊन पैशांचा अपहार केल्याचा खोटा आरोप लावल्याच्या कारणामुळे सुमेध शत्रुघ्न हातोले (वय 28) रा.तुलंगा बु. तालुका पातूर याने सदरची तक्रार पातूर पंचायत समितीमध्ये केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सदर युवकाने कंटाळून पंचायत समितीच्या इमारतीवर चढून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता तिथे उपस्थितांनी तातडीने धाव घेऊन सदर युवकास पकडल्याने सुदैवाने अनहोनी टळली.
यावेळी अचानकपणे घडलेल्या घटनेमुळे पंचायत समिती आवारात एकच खळबळ माजली असून प्रकरण नेमके काय आहे हे कुणाला कळायच्या आत सुमेध हातोले हा युवक पातूर पंचायत समितीच्या इमारतीवर चढून अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याच्या प्रयत्नातच होता एवढ्यात सामाजिक कार्यकर्ते राणा डाबेराव,निशांत गवई,दिनेश गवई,शैलेंद्र गुडधे यांनी सदर युवकास पकडून त्याची समजूत घालून त्याला खाली उतरविल्याने अनर्थ टळला.दरम्यान पातूर पोलीस स्टेशनचे रामानंद भावाने,विकास जाधव,वसंत राठोड,अरविंद पवार यांनी घटनास्थळी पोहचून सदर युवकास ताब्यात घेतले असून ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई पातूर पोलीस करीत आहेत.
Users Today : 23