शीर्ला येथील युवतीच्या हत्येची सखोल चौकशी करा अखिल भारतीय पाथरवट समाजाची मागणी

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर :- तालुक्यातील शीर्ला खदान येथील युवतीचा निर्गुण खून करण्यात आला असून सदर प्रकरणांमध्ये सामूहिक बलात्कार व घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व सदर आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भटके विमुक्त विकास परिषद व अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघ यांच्या वतीने करण्यात आली यासंदर्भात पातुरचे पोलीस निरीक्षक यांना दिनांक 1 ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले सदर घटनेत काही अन्य मारेकऱ्यांचा देखील सहभाग असण्याची शक्यता आहे पोलिसांनी या घटनेची सर्व बाजूंनी सखोल चौकशी करून उर्वरित सर्व मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी व त्यांच्यावर भादवी अंतर्गत योग्य त्या कलमानुसार गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा होईल अशी कार्यवाही करावी व पीडित युवतीच्या कुटुंबांना न्याय मिळवून द्यावा असे त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे. सदर निवेदन देताना अखिल भारतीय पाथरवट समाज अध्यक्ष भास्कर बळकार, सरचिटणीस उद्धवराव काळे,विदर्भ सरचिटणीस हिम्मतराव ढाळे, नारायण वाडेकर, गजानन खर्डे, दिनेश कोकणे, उमेश खर्डे, शेषराव खर्डे के टी सोनवणे, प्रवीण सूर्यवंशी, दत्तात्रय खर्डे, रमेश ढाळे, सुरेश ढाळे,राजू खर्डे, यांच्यासह पाथरवट समाज महासंघाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व भटके विमुक्त विकास परिषदेचे कार्यवाहक नरसिंग झरे उपस्थित होते

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *