प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातूर – अधिक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी पातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोर्णा धरण परिसरात असलेल्या नंदेश्वर महादेवाचे तब्बल १८ वर्षांनंतर व्यवसायाने मासेमारी करणारे पातूरचे प्रमोद श्रीनाथ यांचे कुटूंब तसेच ग्रामस्थांनी मिळून शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक करून जिर्णोद्धार केला.
मागच्या वीस वर्षांपूर्वी विदर्भात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळ पडला होता त्यावेळी मोर्णा धरणाची पाण्याची पातळी खूप कमी झाली होती तेव्हा एका ठिकाणी काही मच्छीमार करणा-या भोई समाज बांधवांना नंदेश्वर महादेव यांची पिंड आढळून आली.त्यांनी ती पिंड तेथून काढली व धरणाच्या काठावर आणून त्याची प्राणप्रतिष्ठा केली सुरवातीला दोन वर्ष त्याठिकाणी त्याचा वर्धापन दिन साजरा झाला नंतर काही कारणास्तव तो साजरा होवू शकला नाही परंतु आता प्रमोद श्रीनाथ सह इतर भोई समाजातील नागरिकांनी १८ वर्षांनंतर नंदेश्वर महादेवाचे जिर्णोद्धार करण्याचे ठरवले होते त्यानुसार अभिषेक करून जिर्णोद्धार करण्यात आले.
याप्रसंगी अनिल श्रीनाथ,प्रमोद श्रीनाथ व त्यांचे कुटुंब तसेच शिर्ला ग्रामपंचायत सदस्या श्रीमती रेणुका ताई गाडगे,धारकरी विजय राऊत,सुहास देवकर,श्रीमती पुंजा बाई गाडगे,बजरंगी राघव गाडगे,सौ.आशाताई श्रीनाथ,सौ.दिपाली गहिले,सौ.सुवर्णा श्रीनाथ सौ.दुर्गा श्रीनाथ,रामदास श्रीनाथ,देविदास श्रीनाथ,विनोद श्रीनाथ,किशोर श्रीनाथ,सागर सौंदळे सह इतर मान्यवर उपस्थित होते.
Users Today : 20