आदिवासी दिन..
आदिवासी समाज
वन्य जीवांचे रक्षक
न जाणे तया महत्व
आम्ही जंगलभक्षक
विलय होणारे पक्ष्यां
ते खरे संकटमोचक
आम्ही असे शिकारी
मारतो जीव वेचक
जंगली बोले हिणवे
तेचं पर्यावरण पूरक
पूजा करतो मातीची
वाचवे निसर्ग मोहक
आदिवासी रे लढवैये
उदाहरणे उद् बोधक
एकलव्य आठवतात
कहाणी कैक रोचक
शिवरायांच्या सैन्यात
बने निष्ठावान सेवक
शक्तीनिशी उभे राही
ते स्वराज्याचे पालक
हळदी घाटातले युध्द
पराक्रम कथा रंजक
दूर ठेवी मुख्य प्रवाहे
आपण समाजभंजक
जपे ते सर्वं परंपरांना
खरे संस्कृती संरक्षक
वंचित प्रगती पासून
नियम आमचे जाचक
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996..
www.kavyakusum.com
Users Today : 0