साहित्य :1 वाटी कणिक , 2 चमचे बारीक रवा ,अर्धा चमचा बेकिंग सोडा ,अर्धा चमचा वेलदोड्याची पूड , आवडत असेल तर अर्धा चमचा जाड सर कुटलेली बडीशेप , दिड कप कोमट दूध , तळण्यासाठी तूप , मीठ .
कृती :प्रथम एका बाउलमध्ये कणिक घेऊन त्यात रवा ,साखर , वेलची पूड घालून आवडत असेल तर बडीशेप पावडर घालावी . 1 चमचा तूप कडकडीत गरम करून त्यावर घालावे . 1 चिमूटभर मीठ घालावे . सर्व हातानी चोळून एकजीव करून घ्यावे . आता दूध किंचित कोमट करून ते हळूहळू त्यात घालावे .बिटरने किंवा चमच्याने सतत ढवळत राहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत .डावाने सहज पडेल अशा प्रकारे भिजवून साधारण तासभर भिजवावे म्हणजे छान मुरेल .आता त्यात बेकिंग सोडा घालून पुन्हा हाताला हलके लागेपर्यंत छान फेटून घ्यावे . मग गॅस वर कढई ठेवून त्यात तळण्यासाठी तूप घालून गरम करण्यास ठेवावे . तूप चांगले गरम झाले आहे याची खात्री करून आधी त्यात अगदी थोडे बॅटर घालून ते न विरघळता व्यवस्थित होत आहेत याची खात्री करून घ्यावी .मग छोट्या डावाने अंदाजे डावभर घालून लालसर रंगावर तळून चाळणीत काढावेत .चाळणी थोडी तिरकी करून एका डिश मध्ये ठेवावी म्हणजे जास्तीचे सर्व तूप निघून जाईल .
मग सर्व्हिंग डिश मध्ये काढून खाण्यासाठी तयार आहेत हे सुरेख मालपोवे. .वैशिष्ट्य :हे मालपोवे करायला अत्यंत सोप्पे असून झटपट होतात . कणकेमुळे आरोग्यास चांगले आहेतच पण चवसुद्धा लाजवाब येते . यासाठी वेगळा पाक करावा लागत नाही .त्यामुळे पाकाचे टेन्शन तर नाहीच पण पुन्हा नंतर शिल्लक राहिलेल्या पाकाचे काय करायचे हा प्रश्नच येत नाही . छान सॉफ्ट व टेस्टी अशी ही मस्त डीश आहे . दरवेळी सणांना गोड श्रीखंड, गुलाबजाम यासारखे पदार्थ तर होतातच ,यावेळी हे करून पाहा .नक्की वन्समोअर् मिळेल .
सौ .स्नेहा मुसरीफ ,पुणे .
Users Today : 0