एल. आर. टी. महाविद्यालयातीत एन. सी. सी. कॅसेट्सनी पटकावली ट्रॉफी

Khozmaster
2 Min Read

अकोला पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे ११ महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन अकोला यांच्या मार्फत १० ऑगस्ट, २०२३ रोजी कल्चरल कार्यक्रम प्रतियोगिता आयोजीत करण्यात आली होती. या प्रतियोगितेमध्ये श्रीमती एल. आर. टी. कॉलेजच्या एन. सी. सी. कॅडेट्सनी ग्रुप डान्स, ग्रुप सॉंग व सोलो डान्स या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन महाविद्यालयाला ट्रॉफी मिळून दिली. ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांच्या नेतृत्वामध्ये या प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतियोगितेमध्ये ११ महाराष्ट्र बटालियनमध्ये येणाऱ्या विविध महाविद्यालय व शाळेच्या एन. सी. सी. कॅडेटनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सामूहिक नृत्य, सामूहिक गान व एकांकी नृत्य या नेहमी प्रकारामध्ये एल.आर. टी. महाविद्यालयाच्या युनिटने सहभाग घेऊन तिसरा क्रमांक मिळवून ट्रॉफी प्राप्त केली. तसेच कॅडेट कल्याणी आमले ने एकांकी नृत्यामध्ये उत्कृष्ट नृत्य सादर केले त्यासाठी तिला ट्रॉफी देऊन सन्मानित केले गेले. ग्रप डान्स मध्ये कॉर्पोरल वैष्णवी ढेमरे, कॅडेट नीतीक्षा पांडे, कॅडेट सारिका यादव, कॅडेट सिमरन इंगळे, कॅडेट लक्ष्मी सुडे, कॅडेट उर्मिला बुंदेले, कॅडेट धनश्री चव्हाण, कॅडेट धनश्री दाने, कॅडेट प्रेम अहिर, कॅडेट आदित्य वाकोडे, कॅडेट त्रिशब कोकाटे, कॅडेट स्वराज बोदडे तर ग्रुप सॉंग मध्ये कॅडेट सार्जेंट ऋषिकेश पटेल, कार्पोरल सागर वानखडे, कॅडेट प्रणव इंगोले, कॅडेट श्रीकांत वाडोकार, कॅडेट सर्वेश धांडे, कॅडेट साक्षी गुप्ता, कॅडेट तनया नाफाडे, कॅडेट नयना टोंगळे व कॅडेट कल्याणी आमले या कॅडेटनी सहभाग घेतला होता. तसेच कॅडेट साक्षी पांडे, कॅडेट आर्या गंगाखेडकर, कॅडेट सलोनी यादव, कॅडेट पूर्वा देवगरे, कॅडेट हेमंत पिंपळे, कॅडेट चेतन जगताप, कॅडेट रोहन साबे, कॅडेट नयन घुगे यांनी सुद्धा या प्रतियोगितेमध्ये आपली भूमिका बजावली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची, एन.सी. सी. ऑफीसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर, प्रा. डॉ. जी. जी. गोंडाणे, प्रा. डॉ. वर्षा सुखदेवे व प्रा. डॉ. टी. जी. मिरगे यांनी कॅडेट्सनी मिळविलेल्या यशाबद्दल तसेच महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्याचा सत्कार केला. एन. सी. सी. कॅडेट्सनी मिळवलेल्या यशाबद्दल बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इंजि. अभिजित परांजपे, मानद सचिव पवन माहेश्वरी, सहाय्यक सचिव सी. ए. विक्रम गोलेच्छा व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी सुद्धा शुभेच्छा देऊन कॅडेट्सचा आत्मविश्वास वाढविला.

 

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *