” मेरी माटी मेरा देश ” अभियान अंतर्गत पातूर शहरात विविध उपक्रम

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर : – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रम अंतर्गत केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार ” मेरी मिट्टी मेरा देश ” अभियान जिल्हाधिकारी अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पातूर शहरात शिला फलकाची उभारणी करण्यात आली. वसुधा वंदन देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण झाल्याचे औचित्यावर शहरातील जागा निश्चित करून वसुधा वंदन म्हणून विविध देशी प्रजातींच्या 75 रोपट्यांची लागवड करून अमृतवाटिका तयार करण्यात आली. स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच सुरक्षेसाठी ज्यांनी बलिदान केले अशा संरक्षण दल,निम संरक्षण दल, पोलीस दलातील शहिदांच्या व स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्यांचा तसेच आजी-माजी सैनिकांचा अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्थानिक पारंपारिक पद्धतीने यथोचित सन्मान नगरपरिषद पातुर येथे करण्यात आला.

नगर परिषद पातुर येथील अधिकारी कर्मचारी व शहरवासीयांनी हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घेतली.

स्थानिक नागरिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील नगरपरिषद शाळेत ध्वजारोहण करून राष्ट्रगीताचे गायन झाले.तसेच दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत मागील वर्षी प्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम राबवून प्रत्येक घरोघरी राष्ट्रीय ध्वज फडकविणे बाबत जनतेला आव्हान करण्यात आलं तसेच राष्ट्रीय ध्वज विक्री बाबत नगरपरिषद पातुर येथे स्टॉलचे सुद्धा उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला पातूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सैय्यद एहसानोद्दीन यांनी खूप मेहनत घेतली तसेच याच्या यशस्वीतेसाठी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, शहरातील सन्माननीय नागरिकांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *