श्री.बालादेवी इंग्लिश स्कुलमध्ये ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Khozmaster
1 Min Read

 

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

पातूर :- पातूर येथे अकोला पातूर रोडलगत असलेले श्री बालादेवी इंग्लिश स्कूल मध्ये ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला.श्रीमती शोभा धरमठोक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषण, देशभक्तीपर गीतगायन व नृत्य सादर केले. त्यामध्ये विजयी विश्व तिरंगा प्यारा, ऐ वतन वतन मेरे, हम होंगे कामयाब, The tricolour of India, We shall overcome, नन्हा मुन्ना राही हूँ इ. गाण्यांचा समावेश होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री काळपांडे सर, संस्थाध्यक्ष श्री. निलेश धरमठोक सर,प्रमुख अतिथी श्री. मोहनभाऊ जोशी, श्री.रामेश्वर वाढी, श्री.बाळापुरे सर, ,श्री.विलास धरमठोक सर, श्री.विनय इंगळे सर, श्री. गायकवाड सर,श्री.नितीन धरमठोक सर , शोभाताई धरमठोक मॅडम,मुख्याध्यापिका सौ. अश्विनी धरमठोक मॅडम इत्यादी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. संचालन सौ. सरोज सुरवाडे मॅडम यांनी केले विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात उत्तम प्रकारे सादरीकरण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *