पकडलेला माल वन विभागातील कर्मचारी यांनी परस्पर टाकला विकून माहितीच्या अधिकारातून प्रकार उघड

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी राहुल सोनोने  पातूर तालुक्यांतील आलेगाव वन परिक्षेत्र अंतर्गत आलेगाव येथील एका व्यक्तीने माहितीच्या अधिकारातून मिळालेला माहिती नुसार शेकापूर् बीट क्रमांक 1 मध्ये दिनांक 24/02/2021 रात्री वन विभगाचे कर्मचारी वनपाल संदीप डेंगे यांच्या मार्गदर्शनाखली, एम एस राठोड, दामू जाधव वन मजूर पेट्रोलिंग वर असताना वन विभागाने जांब मायनर येथे सगवानचे 9 नग जप्त केले होते. त्यांची माहिती सुध्हा दैनिक भास्कर वर्तमान पत्रामध्ये प्रसिद्ध केली होती. सदर सागवान जप्ती केल्या नंतर वनपाल यांनी त्याच वेळेस पी ओ आर फाडने आवश्यक होते मात्र त्यांनीं तसे न करतां आज पर्यंत पी ओ आर फाडला नसल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहीती दिल्याचे सामोरं आले आहे. त्या मुळे पेट्रोलिंग वर पकडलेला माल पी ओ आर न फडता परसपर वन विभागातीलच कर्मचारी यांनी विकला असी तक्रार उपवनसंरक्षक अकोला याचे कडे आलेगाव येथील काही नागरिकांनी केली व सदर दोशी कर्मचाऱ्यावर कार्यवाही ची मागणी केली आहे.

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *