दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित
श्रीमती ल. रा. तो वाणिज्य महाविद्यालय अकोला येथे दि .बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता मानद सचिव पवन माहेश्वरी, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इंजिनियर अभिजीत परांजपे, सहसचिव सीए. विक्रमजी यांच्या मार्गदर्शनात दिनांक 17/08/2023 रोजी महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम मध्ये पदवी वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.डी .सिकची तर प्रमुख पाहुणे म्हणून साळुंकाबाई कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. जी .जी गोंडाणे व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या समन्वयक डॉ.वर्षा सुखदेवे एम .सी .एम अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. टी .जी मिरगे क्यू .एस. सी समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीतांनी होऊन, सरस्वती पूजना नंतर पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा परिचय करून दिला.
उन्हाळी सत्र 2022 मध्ये उत्तीर्ण झालेल्या बी.कॉम, एम. कॉम , एम. सी. एम, व व्यवस्थापन अभ्यासक्रम च्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष आणि पाहुण्यांच्या हस्ते पदवीचे वितरण करण्यात आले.प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे यांनी आपल्याला मिळालेल्या अनमोल संधीचा पुरेपूर उपयोग भावी जीवनात कसा करता येईल याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच आपण समाजाचे गुरुजनांचे व माता पित्याचे ऋणी असून त्यांचे देणे लागतो याची जाणीव विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून करून दिली. पदवीनंतर च्या काळात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.पदवी वितरण कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता दि.बी.जी ई सोसायटीचे समस्त माननीय कार्यकारी सदस्यांचे मार्गदर्शन लाभले. पदवी वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ. मोनिका साबू यांनी केले डॉ. एन. एन.चोटीया यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला .या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. व कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
Users Today : 4