आकोट येथे दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार थांबवा  -अकोट तालुका शिवसेना ठाकरे गटा चे निवेदन

Khozmaster
3 Min Read

*खरेदी विक्री च्या वेळी लुबाडणूक*

 

– आकोट येथे दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार थांबवा

-अकोट तालुका शिवसेना ठाकरे गटा चे निवेदन

अकोट – विशाल गवई

अकोट येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मालमत्ता खरेदी विक्री करताना संबंधांकडून आर्थीक लुबाडणूक होत असल्याचा प्रकार थांबवावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे .हे निवेदन

शिवसेना पचिम विदर्भाचे संर्पक प्रमुख अरविद सावंत , शिवसेना आकोला सर्पक प्रमुख प्रकाश शिरवाडकर ,शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार नितिन देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर , माजी आमदार संजय गावंडे यांच्या मार्गदर्शनात

देण्यात आले .

गोर गरिबांची होत असलेली लुबाडणूक थांबली नाही तर आंदोलन करण्याचा ईशारा शिवसेना तालुका प्रमुख ब्रम्हा पांडे यांनी दिला आहे .

अकोट येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे गोर गरीब शेतकरी शेतमजुर लोकांनकडुन पैसे लुबाडणीचा अड्डा बनला आहे. अनेक गोर गरीब लोकांना शासनाने घरकुलांसाठी मंजुरी दीली आहे .जागेची खरेदी करण्यासंदर्भात लोक दुय्यम निबंधक ऑफीस मधे येत आहेत. त्यामध्ये या लोकांना अव्वाच्या सव्वा खरेदी खर्च सांगण्यात येत आहे. दुय्यम निबंधक कार्यालय येथेच थांबत नसून साहेब या लोकांनकडून काही चिरीमीरी आफीसमध्ये ऑप्रेटरच्या माध्यमातुन किंवा बाहेरील दलाली करणाऱ्या मार्फत स्वतः प्रत्यक्षरित्त्या कार्यालय बंद झाल्यानंतर घेत आहे. सदर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्यामुळे पैशांची देवान घेवान होते. त्यामुळे येथे भविष्यात काही अनुचित प्रकार होऊ नये व गोरगरीबांची लुट थाबंविन्यात यावी, या साठी सदर ऑफीस मध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात यावे व गोर गरीब जनतेची लुबाडनूक थांबवावी अन्यथा शिवसेने च्या वतीने शासनाविरोधात आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा ईशारा या निवेदनातुन दिला आहे . निवेदन देतांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे ,महिला जिल्हा संघटीका मायाताई म्हैसने ,जिल्हा समन्वयक शाम गावंडे , विधानसभा संघटक विक्रम जायले , युवासेना उपजिल्हाप्रमुख मनीष कराळे, प्रमुख मनोज खंडारे , शहर प्रमुख अमोल पालेकर , ता संघटक रोशन पर्वतकर , विलास ठाकरे ,बच्चू भगत ,सचिन सोनोने आदींची उपस्थिती होती .

*मूल्यांकन प्रमाणपत्र एका दिवसात या पूर्वी मिळत होते .आता या प्रमाणपत्राकरिता आठ दिवस लागत असल्याचे नागरिक सांगतात .तसेच बाहेरील दलालामर्फत आर्थीक देवाण करून निबंधक कार्यालयातील केलेली कामे लगेच होतात असेही नागरिक सांगत आहेत .त्यामुळे गोर गरिबांसह नागरिकांची बेकायदेशीर लुबाडणूक सहन केली जाणार नाही .शिवसेना हा गैरप्रकार थांबविण्याची मागणी करीत आहे .अन्यथा या बाबत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शिवसेना ता .प्रमुख ब्रम्हा पांडे यांनी दिला आहे

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *