जनसंवाद पद यात्रा तालुक्याच्या विकासाचा मूलमंत्र माजी आमदार विजय खडसे

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी मैनोदिन सौदागर निगंनुर.                               सत्ताधाऱ्यांना काँग्रेस शिकविणार धडा   निगंनुर येथ आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो’ यात्रेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. केरळ ते जम्मू काश्मीरपर्यंत देश पादाक्रांत करीत राहुल गांधी यांनी काँग्रेसचा हात बळकट केला. काँग्रेसची वज्रमूठ साकारण्यासाठी महाराष्ट्रातील गाव खेड्यात काँग्रेस कमिटीच्यावतीने गुरुवार पासून उमरखेड तालुक्यात जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली असून काँग्रेसचे कार्यकर्ते गावोगावी जाणार आहेत.

उमरखेड तालुका काँग्रेस कमिटीने तालुक्यातील निगंनुर येथील बादशाहा मियाँ. शपिनाथ मंदिर. हनुमान मंदिर येथील मंदिरात नारळ फोडून जनसंवाद यात्रेचा श्रीगणेशा केला आहे.

काँग्रेसचे माजी आमदार विजयराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनसंवाद यात्रा दि . 6 ते 9 सप्टेंबर उमरखेड तालुक्यात संपन्न होणार आहे.

गटातटाचे राजकारण विसरून काँग्रेसचे जेष्ठ तसेच युवा कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत. 9 सप्टेंबर रोजी उमरखेड तालुक्यातील मेट येथून सकाळी 8 वाजता या यात्रेला सुरुवात झाली आहे. 9 सप्टेंबरपर्यंत ही यात्रा तालुक्यातील सर्व गावांमध्ये ही संपन्न होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे . यावेळी माजी आमदार विजयराव खडसे ज्येष्ठ नेते तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष दतरावजी शिंदे .साहेबराव कांबळे ,.तातुभाऊ देशमुख. बिरजूलाल मुडे.प्रेमराव वानखेडे. सुशिल गव्हाळे पि .शि.भोळे.डॉ सुनिल बरडे.नामदेव मुरमुरे. इंदल चव्हाण. इमरान पठाण. ओमकार घावस . किशोर भवरे ,सुभाषराव शिंदे.मधुकराव फटींग.अनिल राठोड. मधुकर जाधव. सचिन राठोड. यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी पदयात्रेत सहभागी झाले होते .

 

0 9 5 0 5 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *