जी ट्वेन्टी..

Khozmaster
1 Min Read

जी ट्वेन्टी ..

 

जी ट्वेन्टी परिषद

प्रगतीशील भारत

वर्षाव शुभेच्छांचा

घोड दौड अविरत

 

विश्वासकौशल्यात

करे विश्वाचे सारथ

अग्र स्थानी दौडत

शोभतो प्रगति रथ

 

महत् प्रयासे साध्य

पूर्ण झाले मनोरथ

तहान भागवेअमृत

गंगा आणे भगिरथ

 

घेवून सकल सोबत

प्रबळ करी जनमत

चौकस असे जनता

होती सहज सहमत

 

मागास म्हणू हिणवे

शेवटी रांगेत तिष्ठत

अग्रभागी सहभागी

तो शोभतो प्रतिष्ठीत

 

चंद्रावरती चांद्रयान

घडे असे अकल्पित

अंतरिक्षा ध्रुव तारा

नसे कपोल कल्पित

 

नवआशा प्रफुल्लित

भारतास अध्यक्षपद

वसुधैव कुटूंब नारा

स्मरणात ही परिषद

 

— हेमंत मुसरीफ पुणे.

9730306996..

www.kavyakusum.com

0 9 4 2 4 3
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *