राहुल हंडोरे यांजकडून ) भटके विमुक्त आणि आदिवासीनी स्वतःला कमी लेखू नये

Khozmaster
3 Min Read

नरहरी झिरवळ –    (विधानसभा मा. उपाध्यक्ष)

सिन्नर दि.8 सप्टेंबर : भौगोलिक परिस्थिती प्रमाणे भटके विमुक्त, आदिवासी समाजाच्या योजना राबविण्यात याव्यात. राज्यात 66 मतदार संघात आदिवासी समाजाचे प्रॉबल्य आहे. भटके विमुक्त समाजाने आत्मविश्वास, इच्छाशक्ती बाळगावी, त्यांनी स्वतःला कमी लेखू नये असे उदगार विधानसभा मा. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सिन्नर येथे आध्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती प्रितर्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले. अध्यक्षस्थानी सिन्नर विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार मा श्री माणिकराव कोकाटे होते.

उमाजी नाईक भटके विमुक्त आदिवासी इतर मागास प्रवर्ग परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने राजे उमाजी नाईक यांच्या 232 व्या जयंती चे आयोजन सिन्नर येथे करण्यात आले होते त्या प्रसंगी नरहरी झिरवळ हॆ बोलत होते. अध्यक्ष पदावरून बोलतांना आमदार श्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजाना सळो की पळो करून सोडणारे रामोशी समाजाचे आध्यक्रांतिवीर उमाजी नाईक व इतर क्रांतिकारक यांचा इतिहास एकाच ठिकाणी दिसेल अशा क्रांतिकारांचे भव्य दालने उभारणार तसेच स्मारकासाठी पैसे कमी पडू देणार नाही अशी घोषणा माणिकराव कोकाटे यांनी अध्यक्षपदावरून बोलतांना केली.

राजे उमाजी भटके विमुक्त आदिवासी इतर मागास प्रवर्ग परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष कैलास भंडलकर म्हणाले की, रामोशी समाजाचे आध्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक, भिल्ल समाजाचे क्रांतिवीर भागोजी नाईक, व महादेव कोळी समाजाचे क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे त्रिशिल्प सिन्नर येथे आमदार श्री कोकाटे साहेब यांनी उभारले असून या स्थळाला क्रांती स्थळ हे नाव दिले आहे या ठिकाणाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा व मोठया प्रमाणात शासनाकडून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली त्याला विधान सभेचे उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच बोगस राजपुत भामटा , बोगस आदिवासी यांचाही शोध घेण्यात येऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही भंडलकर यांनी केली. डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे म्हणाले की, भटक्या समाजाचे लोक सतत एका गावावरून दुसऱ्या गावात भटकत असतात त्यांना एका ठिकाणी स्थायिक करण्यासाठी त्यांना जमिनीचे वाटप करण्यात यावे. जो जमीन सरकारी है, वो जमीन हमारी है, या घोषणे प्रमाणे भटके विमुक्तांनी एका ठिकाणी स्थिर होऊन संसार थाटावेत असे आवाहन हंडोरे यांनी केले.

 

सभेत भटक्या विमुक्त समाजाच्या महिला राज्य अध्यक्षा मनीषाताई रावळ, नासिक जिल्हा अध्यक्ष अभय सोनावणे, पुरुषोत्तम राहणे, कैलास इथे, आदीची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शरद राऊळ यांनी केले. या प्रसंगी टकारी समाजाचे अध्यक्ष तृशांत जाधव, कैकाडी समाजाचे अध्यक्ष मारुती गायकवाड, कंजारभाट समाजाचे अध्यक्ष रवि अभंगे, पप्पू अभंगे, भटक्या समाजाचे नेते अशोक गायकवाड, रामनाथ बर्डे, नवनाथ चव्हाण, धनराज भोये, मुरलीधर धात्रक, आसाराम तांबे, राजू वाघमारे, सुरेश नाठे, भीमराव भोये, योगेश लहांगे, बाळा कचरे, छगन खंबाईत, रोविदास अंडे, सुनीता मोरे, अमोल मंडले, संदीप गुळवे, सोपान जेडगुले, विकास मंडले, पंढरी मंडले, रावसाहेब मंडले, नवनाथ गोफने लक्ष्मण गपले अनिल मंडले आदि विविध जिल्यातून आलेल्या आदिवासी भटके विमुक्त व रामोशी समाजाच्या प्रतिनिधिनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

 

0 9 5 0 5 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *