प्रतिनिधी अशोक भाकरे अकोला स्लग उरळ पोलिसांची कामगिरी स्लग मोबाईल लोकेशन वरून आवळल्या मुसक्या
एक वर्षापूर्वी घडलेल्या विनयभंग प्रकरणातील आरोपीला मोबाईल लोकेशनवरून पुणे येथून त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्याची उल्लेखनीय कामगिरी उरळ पोलिसांनी केली .
किरण कारभारी सेजवल वय ३३ रा पुणे याने सप्टेंबर २०२२ मध्ये निंबा येथील एका महिलेचा विनयभंग केल्याची फिर्याद संबंधित महिलेने पोलिसात एक वर्षापूर्वी दाखल केली होती तेंव्हा पासून सदर आरोपी मोकाटच होता .या एक वर्षापूर्वीच्या या गुन्ह्याची गंभीर दाखल ठाणेदार गोपाल ढोले यांनी घेत या प्रकरणात पोलीस अधीक्षक संदीप घुगे ,अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनात आरोपीचे मोबाईल लोकेशन घेत त्याला त्याच्या राहत्या घरातून पुणे येथून ताब्यात घेण्याची उल्लेखनीय कामगिरी ठाणेदार गोपाल ढोले ,बीट जमादार संतोष भोजने ,पो कॉ रवी हिंगणे केली
Users Today : 20