धावत्या रेल्वेतून कोसळून इसमाचा मृत्यू, गोरेगाव नजीकची घटना

Khozmaster
1 Min Read

बोरगाव मंजू बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोरेगाव नजीक लोहमार्गावर रेल्वेतून पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शणीवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली,

गोपाल चोरे असे मृतकाचे नाव आहे,

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोरेगाव (पुंडलिक महाराज) नजीक लोहमार्गावर रेल्वेतून पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती काटेपुर्णा रेल्वे स्टेशन कर्मचारी यांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात माहिती दिली वरुन ठाणेदार मनोज केदारे, हेडकॉन्स्टेबल कमलेश धर्माधिकारी, तुषार मोरे सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा केला असता सदर इसम गोपाल विठ्ठल चोरे वय ४५ डाबकी रोड अकोला असे सदर मृतकाचे नाव चौकशी अंती निष्पन्न झाले, दरम्यान सदर इसम धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे, नेमका अपघात कसा झाला या दृष्टिकोनातून ठाणेदार मनोज केदारे सह पोलीस तपास करीत आहेत, दरम्यान रेल्वे कर्मचारी यांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात फिर्याद दिली वरुन पोलिसांनी पोलिस दप्तरी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला, पुढील तपास पोलीस करत आहेत,

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *