शहरात दशहत पसरविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा – उमेश इंगळे

Khozmaster
2 Min Read

अकोला : मागील 3 दिवसापासून बिबट्या हिंगना आणि वाशीम बायपास परिसरात धुमाकूळ घालून नागरिकांना जखमी करत आहे, या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत, वनविभाग नागरिकांना नुसते आव्हानच करताना दिसत आहे परंतु बिबट्याला जेरबंद करून येथील नागरिकांना भयमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करीत नाही आहे.

हिंगणा परिसरात बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला चढविल्यानंतर दुसऱ्या दिवशीही गंगानगर परिसरात हा बिबटा दिसल्याची माहिती आहे. त्यामुळे या बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभाग आणि पोलिस या बिबट्याचा शोध घेत असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे फक्त आवाहनच वनविभागाकडून करण्यात येत असून बिबट्या ला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश येत आहे.

अकोला शहरातील हिंगणा परिसरात शुक्रवारी दुपारी एका बिबट्याने भोला जाधव नामक चौकीदारावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात

उपचार सुरू आहेत. याच हल्ल्यात एक तरुणही जखमी झाला होता. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना गंगानगर परिसरात फिरताना आढळून आला.तर दि १०/०९/२०२३ रोजी विराज पार्क हिंगणा येथे बिबट्या च्या पायाचे ठसे आढळून आले आहेत.

त्याची माहिती वनविभागाला देण्यात आली असून हिंगणा व शहरातील नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण पसरले आहेत म्हणून वनविभागाने तात्काळ मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबऊन दहशत पसरविणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी आपले सरकार पोर्टल वर व जिल्हाधीकारी यांना ईमेल द्वारा केली आहे.

 

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *