मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ चौहटा बाजार कडकडीत बंद*

Khozmaster
1 Min Read

  • *मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ चौहटा बाजार कडकडीत बंद*

व्यापाऱ्यांनी केले बंदला पूर्ण सहकार्य.

 

*प्रतिनिधी विशाल गवई

 

जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून बेछूटपणे अमानुष लाठी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षांनी पुकारलेल्या चौहटा बाजार बंदला व्यापारी बांधवांनीही पूर्ण सहकार्य केल्याने चौहटा बाजार कडकडीत बंद पाळण्यात आला.

या दरम्यान चौहटा बाजार परिसरातील चौकात सर्व पक्षांतर्फे काही वेळ नारे देऊन निदर्शने करण्यात आली. वर्तमान शासन व पोलीस प्रशासनाच्या अमानुष कृत्याचा या ठिकाणी निषेध करण्यात आला. त्यानंतर सर्व पक्षीय नेते व प्रहार चे  उपाध्यक्ष जीवन खवलेे व कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरातून निषेध पदयात्रा काढली.

0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *