प्रतिनिधी मैनोदिन सौदागर निगंनुर.भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेड व जिल्हा उद्योग केंद्र यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरणासाठी उद्योग मेळावा शिबीराचे आयोजन दि.९ सप्टेंबर रोजी उमरखेड येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत व प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे श्री येरूळकर साहेब,कांबळे साहेब अल्काताई मुडे हे हजर होते . या कार्यक्रमाची प्रस्तावना दुर्गाताई महामुने यांनी मांडली तर सूत्रसंचालन पुजा तगडपल्लेवार यांनी केले व आभार माधवी ताई राऊत आणि आश्विनी ताई भोकरे यांनी केले. या कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली . या वेळी उपस्थित जिल्हा उद्योग केंद्राचे प्रशिक्षकांनी महिलांना विविध व्यवसाया संदर्भात मार्गदर्शन केले.तसेच भाविक भाऊ भगत यांनी सर्व महिलांना स्वता स्वावलंबी बनविण्यासाठी महिलांना आवाहन केले व सक्षमीकरणासाठी महिलांच्या विकासासाठी हेल्प फाऊंडेशन नेहमी तत्पर राहणार उद्योग उभारून देण्यासाठी सर्वपरी मदत करणार असे आपल्या भाषणात सांगितले.तसेच ज्या महिलांनी स्वतःच्या पायावर हिमतीवर व्यवसाय उभा केला अशा महिलांचे सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आले यामध्ये कल्याणी ठाकरे यांनी स्वतःच्या पायावर ब्युटी पार्लरचा व्यवसाय उभारून स्वतःचे नाव लौकिक केले त्यांना नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे या त्यांच्या कार्यामुळे त्यांचा भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत यांनी सत्कार केला या वेळेस त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा कसा राहिला कुठल्या अडचणींना त्या सामोरी गेल्या याबद्दल मार्गदर्शन केले याच प्रकारे स्वतःच्या हिंमतीवर ब्युटी पार्लर चा व्यवसाय उभारून मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपले नाव लौकिक करणारी पूर्वा महामुने ताई याचा सुद्धा सत्कार हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत यांनी केला.तसेच रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता. या वेळी महिलांनी भाविक भाऊ भगत यांच्या कडून साडी भेट करण्यात आली. तसेच विविध महिला पदाधिकारी यांच्या नियुक्ती सुद्धा करण्यात आल्या. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अनुप शेखावत. जिल्हा उपाध्यक्ष विष्णू चौधरी .जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद राठोड .जिल्हा उपाध्यक्ष संतोष ठमके. तालुका अध्यक्ष राजकुमार शिरगरे .तालुका अध्यक्ष शुभम वानखेडे. उपाध्यक्ष शुभम राठोड .विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष गणेश भागवतकर. उपाध्यक्ष पियुष हरणे अपंग संघटना तालुका अध्यक्ष प्रेमानंद पांचाळ. तालुका अध्यक्ष विद्यार्थी संघटना डिंगाबर ब्रम्हटेके. तालुका संयोजक सौरभ तगडपल्लेवार. तालुका उपाध्यक्ष विजय अवधूत .तालुका उपाध्यक्ष सुरज पवार. प्रकाश जंगले .परमेश्वर मिराशे. सत्यजित भोयर .गौतम मुरादे .सुरज तगडपल्लेवार .संजय काळे .व महिला मोर्चा शहर अध्यक्ष दुर्गाताई महामुने शहर उपाध्यक्ष पुजाताई तगडपल्लेवार शहर उपाध्यक्ष आश्विनी ताई भोकरे शहर संघटक सारिकाताई महामुने शहर सरचिटणीस माधवीताई राऊत शहर सहसचिव मोनिकाताई महामुने शहर समन्वयक माधुरी ताई वाघमारे व समस्त महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 4