विटी-दांडू ने जिंकली सर्वांची मने…. (जेसीआय आकोटचा उपक्रम)

Khozmaster
2 Min Read

विटी-दांडू ने जिंकली सर्वांची मने….

(जेसीआय आकोटचा उपक्रम)

प्रतिनिधी विशाल गवई

स्थानिक अकोट शहरात व्यक्तिमत्व विकास संघटन म्हणून गेल्या चार दशकापासून कार्यरत असलेल्या जेसीआय अकोट ने यावर्षी सप्ताह दरम्यान भारतीय पारंपारिक खेळाची जोपासना करण्याच्या उद्देशाने विटी दांडू या खेळाची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. स्थानिक बिलविले मंगल सभागृहाच्या प्रांगणात झालेल्या या स्पर्धेच्या मंचावर प्रमुख अतिथी संताजी पेंट्स चे योगेश गोतमारे, विद्याधर कोठीकर, झोन ऑफिसर नितीन शेगोकार, आयपीपी अतुल भिरडे, अध्यक्ष प्रवीण बनसोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अमोल टावरी , संचालन सप्ताह प्रमुख विनोद कडू् व पूर्वाध्यक्ष गोपाल जी गांधी यांनी तर आभार सचिव अभिषेक दुबे यांनी मानले. पंच म्हणून पूर्वाध्यक्ष जितेंद्र जी चावडा व अतुल भिरडे, संदीप जी बोबडे यांनी भूमिका निभावली. ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यामध्ये तब्बल पन्नासच्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला. अ गटातून प्रथम क्रमांक अब्दुल मजीद द्वितीय क्रमांक अथर्व सावरकर व तृतीय क्रमांक शेख तौसिक यांना तर ब गटातून प्रथम क्रमांक ओम द्वितीय शेख भाईजान तृतीय क्रमांक बावा व प्रोत्साहन पर बक्षीस शेख इर्शाद यांना जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता मिलिंद झाडे, निलेश हाडोळे यांच्यासह सर्व, पूर्व अध्यक्षांचे मार्गदर्शन लाभले , सह सप्ताह प्रमुख कृष्णन बजाज भारत कोथळकर ,अमित ठाकूर, अजय अडोकार चेतन उपासे, चैतन्य बुब, हिमांशू अग्रवाल, सागर अंबळकर प्रसाद देशपांडे, प्रशांत पिंपळे, विवेक गणोरकर ,भारत कोथळकर भारत वासे,अमर राठी, मनोज लकडे ,संदीप चांडक किशोर लहाने, शिरीष घाटोळ,अनिल सुलताने भगवान लांडगे ,निलेश इंगळे, यांनी अथक परिश्रम घेतले

0 9 4 6 7 0
Users Today : 20
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *