अतिरिक्त भारनियमन बंद करा   – वीज कंपनी अभियंत्याना मागणी  – प्रहार जनशक्ती पक्ष सरसावला 

Khozmaster
3 Min Read

अतिरिक्त भारनियमन बंद करा

वीज कंपनी अभियंत्याना मागणी

प्रहार जनशक्ती पक्ष सरसावला

प्रतिनिधी……  विशाल गवई

 

प्रहार जनशक्ती पक्ष तालुक्यातील वीज समेस्येविरुध्द सरसावला असून आज

अकोट येथे वीज कंपनी कार्यालयावर विराट मोर्चा घेऊन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु, युवक जिल्हाध्यक्ष सुशील पुंडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. अतीरिक्त वीज भारनियमन बंद करा अशी मागणी या वेळी करण्यात आली .

तालुक्यातील

शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा. तसेच ग्रामीण भागातील लोड सेडिंग बंद करण्यात यावे, नवीन वीज जोडणी प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावे अशा आशयाचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षातर्फे वीज वितरण कंपनी ला देण्यात आले. सध्या आगामी दिवसात विविध उत्सव येत आहे. यामध्ये गणेश उत्सव, दुर्गादेवी, ईद मिलादुन्नबी असे उत्सव येत आहे. यामुळे वीज भारनियमन चा खूप त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच अर्ज केल्यानंतर काही दिवसातच नवीन वीज मीटर देण्यात येते मात्र कार्यालयामार्फत तीन तीन चार चार महिने विज बिल मिळत नसून शेतकरी तथा गरीब वर्ग ऑफिसमध्ये चकरा मारत असल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकरिता प्रहार जनशक्ती पक्ष मार्फत वीज वितरण कंपनीला निवेदन देण्यात आले .

निवेदन देतेवेळी प्रहार चे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु, प्रहार युवक जिल्हाध्यक्ष सुशील पुंडकर, प्रहार तालुकाप्रमुख गणेश गावंडे, प्रहार शेतकरी आघाडी भैय्या डिक्कर, ज्ञानेश्वर दहीभात, पंचायत समिती सदस्य ,शुभम नारे तालुका संघटक अवि घायसुंदर, प्रहार युवक शहर प्रमुख बल्ली राजा,बंटी भाऊ पांडे, तालुका युवक संघटक शेखर बेंडवाल, संदीप मर्दाने, पंकज हाडोळे, शाहरुख, आशिष गीते, चेतन मर्दाने, प्रहार जनशक्ती शेतकरी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन खवले.शुभम सागर फुंडकर ऋषी गीते, पवन बंकुवाले, राहुल वाकोडे, सचिन काळे, शेखर साबळे, पवन बाणेरकर, युवक शहर उपाध्यक्ष ओम गवई, शहर संघटक दीप लोणकर, कोषाध्यक्ष कृष्णा काकड, प्रहार रुग्णसेवक अकोला मुरकर, अमित बेंडवाल,नाजीम भाई, पियुष बिजवे, श्याम साबळे, शहजाद, समी जमदार, अलीम मौलाना, विलास कडू, जगदीश शेळके, गोपाल लोडम, पिंटू ओहेकर, मोहम्मद दानिश, समर्थ आवारे सौरभ मुरकुटे, अक्षय ठोकळ, शुभम झापर्डे, गणेश आवारे, यश मर्दाने, सागर तायडे, प्रसाद कुलट, जयेश साविकार, प्रथम गावंडे, विजय मानकर, सौरभ जायले, कुणाल पवार, अजय मानकर, राहुल छापरवाल, रोहन बिहारी, अमित गावंडे सागर कडू सुरेश झटले यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *