मुंडगाव येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा

Khozmaster
2 Min Read

मुंडगाव येथे बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी विशाल गवई

 

शेतकऱ्यांना शेती करण्यास मदत करणाऱ्या बैलाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो. या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर) आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.

असाच प्रकार मुंडगाव येथे पहाव्यास मिळाला यामध्येआज मुंडगाव ग्रामपंचायतच्या वतीने सार्वजनिक पोळा उत्साहात प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या बैल मालक मेहमूद बेग न्याम तुल्ला बेग यांच्या जोडीला झूल देऊन व बैल मालकाला शाल व श्रीफळ देऊन अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंदाडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले  व मुंडगाव ग्रामपंचायत

चे सरपंच मीनाताई उईके यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे नवयुक्त ठाणेदार संजय खंदाडे साहेब यांचं शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

लंपी रोगाबद्दल व तोंडखुरी व पायखुरी लसी चे फायदे याबाबत डॉक्टर एस एस आढाऊ पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सविस्तर पशुपालकांना पोळ्याच्या सोहळ्यात माहिती दिली यावेळी उपस्थित

सरपंच मीनाताई उईके, उपसरपंच तुषार पाचकोर, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहिभात, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश वारकरी, ग्रामीण ठाणेदार संजय खंदाडे, पीएसआय विष्णू बोडखे, पोलीस पाटील बाळासाहेब भगेवार, गजानन वारकरी, बीड जमदार भास्कर सांगळे, मनीष कुलट, (होमगार्ड.रुपाली पुनासे).डॉ.एस एस आढाऊ, अतुल काठोळे, जुगलकिशोर चिंचोलकार, दीपक मुंडोकार अरविंद फुसे, इम्रान खान, सुरेश गवई, भास्कर पोहरकार, अजित अहेमद, विलास ठाकरे, भगवान गावंडे, अनिल गाढे, नितीन गाडगे, भीमराव सरकटे, दादाराव गवई.सुरेंद्र खांन्देल, दीपक चिंचोलकर, राहुल भेले, भिमराव सरकटे , सचिन कुलट. राहुल कांबळे.व पत्रकार सोप्निल संरकटे. विशाल गवई. कमलेश राठी व गावकरी मंडळी उपस्थित होते

0 9 4 6 6 6
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *