शेतकऱ्यांना इ पिक पाहणीची मुदत वाढवून द्या;रयत शेतकरी संघटना विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके

Khozmaster
1 Min Read

  1. शेतकऱ्यांना इ पिक पाहणीची मुदत वाढवून द्या;रयत शेतकरी संघटना विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके

 

 

आकोला: प्रतिनिधी विशाल गवई

जिल्हयात ई पीक पाहणी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली होती, परंतु अनेक शेतकरी कृषी योजनांपासून वंचित राहणार आहे. तरी ई. पीक पाहणी अॅप मधील तांत्रिक अडचणी दूर करून शेतकऱ्यांना पीक नोंदणीसाठी मुदत वाढवून दयावी, अशी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ पश्चिम युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी केली आहे. खोडके यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी याना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, पीकवीमा, शासनाकडून शेतीसाठी मिळणारे विविध अनुदान मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणारी मदत यासाठी ई – पीक पाहणी महत्वाची ठरते. मात्र या अॅपच्या अकार्यक्षमते

मुळे शेतकरी वर्ग वैतागला आहे. तर काही शेतकन्यांना माहितीच्या अभावामुळे नोंदणी करणे अवघड जात आहे. वर्जन टू ई – पीकपाहणी अॅप कधी चालते तर कधी चालत नाही, सुरू झाल्यावरही पूर्ण माहिती भरता येत नाही. सतत सव्हर डाऊन च्या समस्या येत आहे. पीकाची नोंदणी करतांना आलेल्या अडचणी हेडलाईन क्रमांक

सांगितल्यावरही दखल घेतली जात नसल्याचे निर्देशनास आले आहे. तरी शासनाने ई – पीक पाहणी अॅप मधील तांत्रिक अडचणी दूर करून शेतकऱ्यांना पीक नोंदणीसाठी मुदत वाढवून द्यावी. अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ पश्चिम युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी केली आहे….

0 9 5 0 5 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *