Khozmaster
1 Min Read

मुंडगाव येथे मोठ्या उत्साहात द्वारका पोळा

 

प्रतिनिधी विशाल गवई

 

मुंडगाव येथे पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वारका पोळा भरवण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या परंपरेला, कित्येक वर्षे पूर्ण होत आहेत. आजही ही प्रथा मुंडगाव येथे कायम ठेवल्याचे चित्र आहे . सर्वप्रथम द्वारका उत्सवामध्ये प्रथम क्रमांक पटकवणारे बैलाचे मालक दौलत हिम्मत आग्रे रा. अमिनपुर यांना ग्रामपंचायत च्या वतीने बैल मालकास शाल व श्रीफळ देऊन व बैलाला झूल देऊन सन्मानित करण्यात आले व तंटामुक्ती अध्यक्ष राजेश गजानन वारकरी

यांचा ग्रामपंचायत च्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला

व ढोल ताशाच्या गजरात गावातून बैलांची मिरवणूक काढून व गावकऱ्यांनी भर पावसात नृत्य करून

नृत्याचा आनंद सुद्धा घेतला व  सरपंच व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी भर पावसात उपस्थित होते

0 9 5 0 5 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *