
*आंदोलनाचा इशारा देताच? आरोग्य यंत्रणेला आली जाग*
प्रतिनिधी विशाल गवई
टाकळी खु ग्रामपंचायतचे सदस्य दीपक पाटकर यांनी
प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला शेतकरी आघाडीचे जीवन खवले यांना
फोन लावून सांगितले की टाकळी खुर्द येथे टाईपेट मलेरियाची साथीची लागण झालेली आहे व वैद्यकीय सेवा देण्याकरिता कोणीच वैद्यकीय अधिकारी येत नसल्याने पेशंटची गैरसोय होत आहे व तसेच प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जीवन खवले तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल राठी यांच्याशी संपर्क करून त्यांना साथ व तापाची माहिती दिली व डॉ राठी यांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब वैद्यकीय टीम दाखल झाली यामध्ये डॉ अमोल राठी. धनी सिस्टर. एन डब्ल्यू वासेकर. एन डब्ल्यू वाडेकर.एन पी डब्ल्यू मेटांगे मातुरकर. व त्यामध्ये 90 पेशंटची तपासणी करण्यात आली. प्रहार चे जीवन खवले यांनी त्वरित दखल घेतल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष जीवन खवले यांचा ग्रामपंचायत मध्ये सत्कार करण्यात आला

या वेळी सरपंच.सदस्य दीपक पाटकर उपसरपंच सौ. मीना चंद्रशेखर गवळी.अक्षय गवळी सुनील दामोदर. जमेल शहा. आणि गावकरी मंडळींनी प्रहार जनशक्ती अकोला शेतकरी आघाडीचे उपजिल्हाप्रमुख जीवन खवले यांचे आभार मानले
Users Today : 4