
खाजगीकरण कंत्राटीकरणा विरोधात धरणे आंदोलन
तेल्हाऱ्यात विद्यार्थीचां आक्रोश
प्रतिनिधी विशाल गवई
शासनाच्या वाढत्या खाजगीकरण कंत्राटी नोकरीचे शासन निर्णय (जिआर) रद्द करणे बाबत तेल्हाऱ्यात 130 ऑक्टोंबर रोजी टॉवर चोक ते तहसिल कार्यालय तेल्हारा पर्यंत धरणे आंदोलन आक्रोश मोर्चा प्रा. सचिनकुमार गव्हाळे सर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना तहसिलदार तेल्हारा मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनात नमूद
विद्यार्थी हे रात्र-रात्र भर विद्यार्थी अभ्यास करुन आपल्या भावी आयुष्यात शासकीय नोकरी मिळण्या करीता अनेक वर्षे संघर्ष करीत असताना शासनाने अचानकपणे नोकर भरती ही खाजगी कंत्राटीकरणे करुन असा शासन निर्णय दिनांक 06 सप्टेंबर 2023 व दि. 18.02.2023 ला खाजगीकरण करुन काढला जो पूर्णपणे चुकीचा व निंदणीय व विद्यार्थ्याचे जिवन उध्वस्त करणारा आहे. असे सुद्धा निवेदनात नमूद आहे निवेदनावर एस के करीयर अकडमी चे प्रा सचिनकुमार गव्हाळे सर, संभाजी करीयर एकडमी चे प्रा ताकोते सर सह असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सह्या आहेत
निवेदनात नमूद मुद्दे
1. दि. 06 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आलेला कंत्राटी पदभरती संदर्भातील शासन निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा.
2. राज्यसरकारने 62 हजार शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करून सरकारी शाळांचा दर्जा अधिक प्रमाणात वाढवण्यात यावा
3. राज्यातील स्पर्धा परिक्षांच्या पेपर फुटीवर कडक कायदा करण्यात यावा व पेपर फुट होणारच
4. राज्यात वर्षभरात होणा-या विविध पदभरती प्रक्रियेसाठी (म. प्र. धरतीवर) एकच परिक्षा शुल्क आकारण्यात यावे
5. राज्यातील सर्व सर्व प्रकारची पदभरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात यावे
6. सरकारी क्षेत्रांचे खाजगीकरण व कंत्राटीकरण त्वरीत थांबविण्यात यावे. दिनांक 13.10.2023
Users Today : 4