राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटामध्ये शारदा थोटे यांची जिल्हा महिला महासचिव पदी निवड*

Khozmaster
1 Min Read

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटामध्ये शारदा थोटे यांची जिल्हा महिला महासचिव पदी निवड*

 

प्रतिनिधी विशाल गवई

 

अकोट तालुक्यातील ग्राम मुंडगाव येथील शारदा कैलास थोटे यांची महिला आयोग अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते जिल्हा महिला महासचिव पदी निवड.दिनांक १२ऑक्टोबर रोजी महिला आयोग अध्यक्ष तथा महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांची अकोला येथे महिला आयोग आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात आला होताऋ व सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर ,विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी जिल्हा अध्यक्ष कृष्णा अंधारे महिला जिल्हाध्यक्ष रूपाली वाकोडे, जिल्हा युवक अध्यक्ष रामभाऊ हिंगणकर प्रदेश संघटक सचिव छायाताई कात्रे, दिपाली पांढरे उज्वला राऊत, मनीषा देशमुख, यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.आढावा बैठकीनंतर आमदार अमोल मिटकरी यांच्या घरी महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या जेवणाचा कार्यक्रम हा सर्व महिला पदाधिकारी सोबत घेऊन संपन्न झाला.यावेळी शारदा कैलास थोटे म्हणाल्या की जो विश्वास पक्षाचे नेते अजितदादा पवार व मश प्रदेशाध्यक्ष रूपलिताई चाकणकर विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी केलेल्या विश्वास पत्राचा, मी पक्ष संघटनेसाठी येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरे जाऊन शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातील गोरगरीब माझ्या महिला भगिनींना पुरविण्याचे व न्याय देण्याकरिता सतत प्रयत्नशील राहील.

0 9 5 0 6 1
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *