देवेंद्र फडणवीसांची मुंबईत पत्रकार परिषद. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात महत्त्वाचं भाष्य. उद्धव ठाकरे आणि ललित पाटील कनेक्शनबाबत महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ड्रग्ज माफिया ललित पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयात पोलिसांच्या ताब्यात असताना पळून गेला होता. यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढताना ललित पाटील प्रकरणात सत्ताधाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत एक गौप्यस्फोट केला. यावेळी फडणवीसांनी ललित पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य कनेक्शनवर बोट ठेवले. त्यामुळे आता या सगळ्याला ठाकरे गट कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Users Today : 17