देवेंद्र सिरसाट.
नागपूर.श्री विद्यार्थी सुधार संघ, नागपूर अंतर्गत येणाऱ्या महात्मा गांधी इंग्लिश मिडीयम हायस्कुल, वानाडोंगरी येथे आज गांधी जयंती निमित्य रस्ता सुरक्षा विषयावर शांतता रॅली चे आयोजित करण्यात आली रॅली मध्ये लोकांना रस्ता सुरक्षा चे धडे देण्यात आले. तसेच ग्राम स्वच्छता अभियान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील प्राचार्य धर्मेंद्र पारशिवनीकर व पर्यवेक्षिका दिपाली कोठे यांचा हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्प्रण करून करण्यात आली. रॅली चा मार्ग शाळेतून वानाडोंगरी चौक, वैभव नगर, महाराष्ट्र चौक ते राजीव नगर हा घेण्यात आला होता. समारोप शालेय परिसरात वंदे मातरम ने करण्यात आला.
महाराष्ट्र चौकात विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा व ग्राम स्वच्छता विषयावर पथनाट्य सादर केलीत व उपस्थित लोकांना रस्ता सुरक्षेविषयी जन जागृत केले. रॅलीत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला त्यामुळे मुख्याध्यापक यांनी एम.आई. डी. सी. पोलीस स्टेशन चे आभार मानले. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात स्वागत केले.
कार्यक्रमाच्या आयोजनार्थ प्रीती धमगाये, कल्पना हिवराळे, माधवी वांधे, रामचंद्र वाणी ,श्रद्धा इरतवार, माधुरी पवार, मंगला कठाणे, अनुराधा खडसे, दीपिका नाटके, रुची पांडे, रेशाकिरण आठवले, मनीष भवरजार, सविता टापरे, नाजुका मैस्कर, लीना नागापुरे, सुरज कृष्णन, विद्या पंचभाई, अंकिता शुक्ला, संध्या चवरे, माधुरी ताजने, श्रुती नंदेश्वर, मोरेन फ्रान्सीस, शुभम चौधरी, प्रशांत नेवारे, सपना निराडकर, पूजा सिंग आदींनी सहकार्य केले.