
शिवाजी ज्युनियर कनिष्ट महाविद्यालय येथे सायबर सुरक्षा बाबत कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधी विशाल गवई
अकोट येथिल शिवाजी ज्यूनियर कनिष्ट महाविद्यालय अंजनगाव रोड अकोट येथे नुकतीच सायबर सूरक्षे बाबत कार्यशाळा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल महावीद्यालयाचे प्राचार्य डॉ.जगदीश साबू, आणी भौतिकशास्र विभागाचे डों.हरिदास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली शितल साखरे,नेहा टेरे, सुमित सपकाळ,व अनिकेत भुडके या विध्यार्थ्यानी सायबर शुरक्षा बाबत, ऑनलाईन फसवणूक,वाढता सोशियल मिडीयाचा वापर त्यामधून होणारी फसवणूक,आपण करीत असलेली ऑनलाईन खरेदी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले
शिवाजी कनिष्ट महाविद्यालय अकोट येथे नुकतीच सायबर शुरक्षा बाबत कार्यशाळा घेवून विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक वालसिंगे होते यावेळी हा कार्यक्रम क्विक हिल फाऊनडेशन पुणे आणी महाराष्ट सायबर सेल मुंबई यांच्या सहयोगाने व अकोला येथील शंकरलाल खंडेलवाल महावीद्यालयाचे प्राचार्य डॉ.जगदीश साबू, आणी भौतिकशास्र विभागाचे डों.हरिदास खरात यांच्या मार्गदर्शनाखाली शितल साखरे,नेहा टेरे, सुमित सपकाळ,व अनिकेत भुडके यांनी शाळेतील विध्यार्थ्याना सायबरसुरक्षा म्हणजे काय?आणी सायबर क्राईमचे कोणते प्रकार पडतात ,वाढत्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदीची फसवणूक कसी होते, मिडीयाचा वापर त्यामधून होणारी फसवणूक ,नवनवीन मोबाईल मध्ये येणारे ऐप, फेसबुक अकाउंट हॅक कसे केले जाते फेक वेबसाईटस कशा ओळखाव्या ,एटी एम पासवर्ड,ओटीपी,याबाबत फसव्या लिंक पासून दूर राहणे याबाबत मार्ग दर्शन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वालसिंगे ,शिक्षक कडू ,गावंड़े म्याडम,चौधरी , हिंगनकर व सर्व शाळेचे विद्ध्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते
Users Today : 9