बुलडाणा : ( खोज मास्टर )अकील शाह*
खामगाव मुस्लिम शाह फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गामध्ये करण्यात यावा, अशी मागणी मुस्लिम शाह फकीर समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी खामगाव यांचेकडे २० ऑक्टाबर रोजी ‘निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनात नमूद आहे की, संघटनेच्या वतीने मुस्लिम शाह फकीर या जातीचा भटक्या विमुक्त प्रवर्गात समावेश करावा म्हणून सन २०१९ पासून राज्य शासनाकडे वेळोवेळी आंदोलने करून व निवेदने देवूनही समाजाला न्याय मिळाला नाही. शासनाने शाह, फकीर मुस्लिम तसेच दरवेश अशा वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय व परिपत्रक काढून या समाजाला शैक्षणीक, आर्थिक सामाजिक सवलती देण्याचे काम केले आहे. एकाच जातीसंदर्भात वेगवेगळे – शासननिर्णय असून त्यासंदर्भात जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या दृष्टीकोनातुन राज्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची दिशाभूल होत आहे. त्यामुळे अधिकारी ठोस निर्णय घेत नाहीत. मुस्लिम शाह फकीर जातीचा आजरोजी इतर मागाय प्रवर्गामध्ये १ जानेवारी २००१ च्या शासन निर्णयाप्रमाणे मुस्लिम फकीर या जातीचा अनुक्रमांक ३३५वर आहे. या यादीतून सदर जात बगळून भटक्या विमुक्त प्रवर्गात समावेश करावा. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पूणे- १ अहवाल ४९ माहे ऑक्टोबर २०१४ या अहवालात आयोगाने यादीतील अनुक्रमांक २३ यादीतील क्र. ३७वर दरवेशी, वाघवाले, शाह (मुस्लीम धर्मिय) यांचा व्यवसाय भीक मागणे आहे. असे नमूद केले आहे. तसेच १ जानेवरी २००१ च्या शासन निर्णयामध्ये इतर मागासवर्ग प्रवर्गामध्ये मुस्लिम फकीर या जातीचा समावेश ओबीसीमध्ये आजरोजी आहे. सदरची जात ही भटकी जमात म्हणून आजही राज्यात ओळखली जाते. त्यामुळे इतर मागास प्रवर्गात समावेश असलेली मुस्लिम शाह फकीर ही जात वगळून भटक्या विमुक्त जातीच्या प्रवर्गामध्ये समावेश करावा. सदर मागणी मान्य न केल्यास २१ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष के. जी. शाह प्रदेश अध्यक्ष, लुकमान शाह जिल्हाध्यक्ष, तहसिन शाह, शाहीद शाह, उस्मान बुढन शाह, जुबैर शाह, सादिक शाह, हसन शाह, इरफान शाह, सोहेल शाह, रजा शाह यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Users Today : 22