प्रविण चव्हाण
नंदुरबार (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्र, पळशी येथे सोमवार पासून कापूस खरेदीच्या शुभारंभ शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
परवानाधारक खरेदीदार यांच्यामार्फत दि.१६ ऑक्टोंबर सोमवार रोजी सकाळी १० वाजता बाजार भावाने कापूस खरेदी व्यवहार सुरू होणार आहे.शेतकरी बांधवांनी कापूस स्वच्छ व कोरडा करून विक्रीस आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह वळवी, उपसभापती वर्षा पाटील,सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे. कापूस खरेदीवर सुरू होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Users Today : 22