
मुंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी निवेदन सादर
प्रतिनिधी..विशाल गवई
अकोट तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुडगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी व रुग्णांना औषधे उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी मुडगांव येथील शिवसेना उबाठा चे विलास ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.वालसिंगे यांना निवेदन देण्यात आले.मात्र येथील चार्ज उमरा उपकेंद्रातील डॉक्टरांन कडे असल्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सदर मुडगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यू,मलेरीया, तापाच्या रुग्णांना सलाईन, इंजेक्शन व औषध, गोळ्या, उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येत आहे.व येथील रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा चा कोणताही लाभ मिळत नसल्यामुळे त्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला औषधी उपचार मिळत नसल्याने या बाबतीत विलास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत माहिती सुद्धा मागीतली आहे.रुग्णांना औषधे उपलब्ध करून देण्यात आली नाही तर शिवसेनेचे वतीने आंदोलन करण्यात येईल.सदर निवेदन देते वेळी विलास ठाकरे यांच्या सोबत तुषार पाचकोर, सुनील नागोलकार,शेख हातम,शेख मन्नु, प्रदिप ठाकरे,नवल नहाडे,सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
*रुग्णांना औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी व रुग्णांची हेळसांड थांबवावी.. विलास ठाकरे शिवसेना (उबाठा)*
Users Today : 20