बातम्या प्रकाशित होताच हरवलेले ‘क ‘ वर्ग दर्जा प्राप्त सप्तशृंगी मातेचे मंदिर शोधण्याचा प्रयत्न !जेसीबी यंत्राच्या साह्याने उत्खनन सुरु

Khozmaster
1 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर , ता . जामनेर ( ता . २१ )    जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर – कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी ‘क ‘ वर्ग दर्जा प्राप्त सप्तश्रृंगी मातेचे मंदिर  हरवले असल्याच्या बातम्या प्रकाशित होताच ट्रस्टचे पितळ उघडे पडले असून मंदिराच्या जागेवर खोदकाम  करण्यात आहे .
  सदर खोदकाम हरलेले मंदिर शोधण्यासाठी केले जात आहे ,  की   मंदिर उभारणी साठी हे मात्र  अद्याप गुलदस्त्यात आहे .
       दरम्यान , भोळ्या भाभड्या भाविकांची व प्रशासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे .
    सोशल नेटवर्किंग साईट वर या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत . भाविकांच्या संतप्त भावनांचा उद्रेक होण्यापुर्वीच प्रशासनाने संबधीतांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी  करण्यात येत आहे .
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *