हिरकणी प्रतिष्ठाणने डॉ.दिक्षासह कुटूंबियांचा केला गौरव
चिखली: 27 सप्टेंबर 2022
आज प्रत्येक क्षेत्रात महिला उतुंग भरारी घेत असुन ईच्छा शक्तीच्या बळावर नारीशक्तीचा बोलबाला होत असतांना गोवा येथील व्हिपीआर इंटरन्टेमेंट या कंपनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मिस इंडीया ग्लोबल 2022 हा देषपातळीवरील खिताब चिखलीच्या डॉ.दिक्षा देषमुख हिने पटकविला तर मेलोडीएस व्हाईस या ट्रॉफिच्या विनर सुध्दा त्या ठरल्या. गोवा येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या हजारो स्पर्धकातुन पहिल्या क्रमांकाचा बहुमान खेचुन आनल्यामुळे डॉ.दिक्षा देषमुख यांनी मातृतिर्थ बुलडाणा जिल्हयाची मान देष पातळीवर उंचावली, ही अभिमानास्पद बाब आहे. विविध क्षेत्रात यष संपादीत करणा-या तरूणी व महिलांना हिरकणी प्रतिष्ठाण कडुन वेळोवेळी सन्मानीत करण्यात येते. देष पातळीवर चिखलीचे नाव गौरवांकींत करणा-या डॉ.दिक्षा या जिजाउंच्या सुकन्येचा आपणास सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन हिकरणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अॅड.सौ.वृषालीताई बोंद्रे यांनी डॉ.दिक्षासह कुटूंबियांच्या सत्कार प्रसंगी केले.
गोवा येथील व्हिपीआर इंटरन्टेमेंट या कंपनीच्या वतीने दिनांक 22 ते 25 सटपेंबर या कालावधीत मिस इंडीया ग्लोबल 2022 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देषभराच्या कानाकोप-यातून सुमारे 5 हजार स्पर्धेक सहभागी झाले होते. त्यात अंतीम सामन्यात 26 स्पर्धकांची निवड होवुन त्यातुन प्रथम क्रमांक पटकविण्याचा बहुमान मातृतिर्थ बुलडाणा जिल्हयातील चिखलीच्या डॉ. दिक्षा बाळासाहेब देषमुख यांनी पटकविला. यास स्पर्धेत व्दितीय क्रमांक केरळच्या निना यांनी तर तृतिय क्रमांकाच्या विजेत्या ओडीसाच्या अंकीता हया ठरल्या. डॉ. दिक्षा बाळासाहेब देषमुख यांच्या या यषस्वी प्रवासात त्यांची मोठी बहिण स्मृती शेळके यांचे त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्षन लाभले असुन सन 2008 साली हिरकणी प्रतिष्ठाणच्या वतीने घेण्यात आलेल्या मिस चिखली स्पर्धेत प्रथम क्रमांक स्मृती शेळके (देषमुख) यांनी पटकाविला होता हे येथे उल्लखणीस. तसेच मिस इंडीया ग्लोबल हा पुरस्कार प्राप्त करणा-या डॉ. दिषा यांची आई सौ. उज्वला देषमुख व वडील बाळासाहेब देषमुख यांनी सदैव या स्पर्धेकरीता डॉ.दिक्षा यांना वेळोवेळी प्रोत्साहीत केल्याचे सांगण्यात आले.
देषात आणी राज्यात सध्या नवरात्र उत्सव मोठया उत्साहाने साजरा करण्यात येत असुन महिलांचे जिवनमान उंचावण्यासह सर्वांगीन विकासासाठी सदैव अग्रेसर असलेल्या हिरकणी प्रतिष्ठाणच्या वतीने मिस इंडीया ग्लोबल हा खिताब खेचून आणून चिखलीचे नाव गौरवाकंींत करणा-या डॉ. दिक्षा व त्यांच्या कुटूंबियांचा सन्मान व सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अॅड.सौ.वृषालीताई बोंद्रे यांच्यासह सौ. भारतीताई बांेद्रे, सौ.विद्याताई देषमाने, सौ. ज्योतीताई बियाणी, श्रीमती प्रमिलाताई जाधव, सौ. मनिषाताई भुते, सौ. वंदनाबाई इंगळे, श्रीमती वनिताताई साखळकर, सौ. वैषालीताई देषमुख, कौसर खान फातेमा, सौ. विद्याताई देषमुख, सौ. शकुंतलाताई झगडे, सौ. रेखाताई देषमुख यांच्या प्रतिष्ठाणच्या सदस्यांची उपस्थिती होती.
Users Today : 4